सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भरती या भरती बद्दल महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, शारीरिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोटिफिकेशन या सर्व महत्त्वाच्या बाबी या लेखात आपण जाणून घेणार आहोत. ही भरती प्रक्रिया 2020 मद्धे RTO inspector bharti झालेली होती, त्यानंतर या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन आले नाही पन 2026 मद्धे नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भरती ची तयारी करत असलेल्या उमेदवारांनी तयारी सुरु ठेवावी. सविस्तर माहिती पुढे पहा.
या भरती साठी 2020 मद्धे जाहिरात आलेली होती तेव्हा 240 जागांवर भरती झालेली होती, त्या आधी 2013 मद्धे देखील 215 रिक्त जागांवर भरती झालेली होती, 2017 मद्धे याच भरतीसाठी सुमारे 833 रिक्त जागांवर भरती झालेली, या माहिती च्या आधारे किती नवीन 2026 मद्धे किती रिक्त जागांवर भरती येऊ शकते. हे सविस्तर माहिती च्या आधारे अंदाज लावू शकता. या विभागात पदांच्या किती जागा रिक्त असतील त्या वरून रिक्त जागा किती येतील हे नोटिफिकेशन आल्यावर समजेल त्यामुळे वेळ न घालवता पुढील भरतीची माहिती पहा.
ही Class – C ची पोस्ट आहे. या पदासाठी सुमारे 38,600 रू ते 1,22,600 रू इतका पगार या पदासाठी मिळतो. ही एक उत्तम पगाराची नोकरी आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार 10 उत्तीर्ण असणे आणि यंत्र अभियांत्रिकी किंवा स्वयंचल अभियांत्रिकी Automobile engineering/ Machenical engineering यामध्ये 3 वर्षाचा डिफ्लोमा किंवा पदवी आणि अनुभव ( अधिकृ नोटिफिकेशन द्वारे सविस्तर माहिती कळेल.)
शारीरिक पात्रता
उमेदवारांची उंची 163 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, आणि छाती 79 असावी आणि फुगून पाच सेंटीमीटर वाढावी. महिला उमेदवार ना 155 सेंटीमीटर उंची आणि वजन 45 किलो असणे आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतात.
निवड प्रक्रिया

RTO bharti selection process पहीली पूर्व परिक्षा त्या नंतर मुख्य परीक्षा होते. पूर्व परिक्षा कशी होते ते पहा. पूर्व परिक्षेसाठी 100 गुणांची परीक्षा असते, पश्न 100 असतात आणि एक तासांचा वेळ असतो ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून देता येते. या भरती मधील प्रश्नांचे स्वरूप हे पदवी लेवल चे प्रश्न यामध्ये विचारले जातात. या परीक्षेनंतर मुख्य परीक्षा घेतली जाते. यामध्ये mcq पद्धतीने प्रश्न असतात. मुख्य परीक्षेसाठी यंत्र अभियांत्रिकी स्वयंचलन अभियांत्रिकी आधारित प्रश्न विचारले जातात प्रश्नांचा स्तर पदवी लेवलचा असतो पदवी लेवल चे प्रश्न या मुद्दे विचारले जातात. मुख्य परीक्षा देण्यासाठी इंग्रजी माध्यमामधून द्यावी लागते मुख्य परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जातात यासाठी 300 गुण असतात यासाठी दीड तास वेळ देण्यात येतो. यासाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल चे सुद्धा प्रश्न उमेदवारांनी करावे ते सुद्धा परीक्षेत विचारले जाऊ शकतात या परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.



वयोमर्यादा
सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक (RTO Inspector bharti) पदासाठी अर्ज करायचा असल्यास किमान वय 19 वर्षे असणे आवश्यक आहे. जनरल मद्धे असलेल्या उमेदवारांना 38 वर्षा पर्यंत अर्ज करू शकता, मागासवर्गीय उमेदवारांना 43 वयापर्यंत अर्ज करता येणार आहे. ओपन मधील खेळाडू आणि मागास प्रवर्गातील खेळाडू साठी 43 वयोमर्यादा आहे. या भरती साठी दिव्यांग उमेदवार अपात्र असतात.
हे सविस्तर माहिती उमेदवारांना देण्यात येत आहे.कारण उमेदवारांनी परीक्षेची तयारी करावी या भरतीच्या जागा लवकरच सुटतील अशी शक्यता आहे .त्यामुळे उमेदवारांना तयारीत राहण्यासाठी ही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे. या भरतीचे कोणतेही नोटिफिकेशन जाहीर झालेले नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे हे फक्त उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यासाठी जी आवश्यक माहिती लागते ती माहिती या लेखाद्वारे पुरविण्यात आलेले आहे.